सर्व महिंद्रा ट्रॅक्टर धारक शेतकरी बांधवांना नमस्कार. सर्व्हिस कॅम्प बाबत माहिती देण्यात आली होती म्हणून मी दिनांक 25जानेवारी2024 ला माझा महिंद्रा अर्जुन Novo 605 Di-i ट्रॅक्टर घेऊन नायगाव येथील शोरुम मध्ये आलो.कॅम्प मध्ये मजुरी मोफत असल्यामुळे इंजिन ऑईल बदली करावी हा हेतू मनात ठेवून व बजेट 4000 धरून कॅम्प मध्ये आलो.
पण जसेजसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स सांगत गेलो तसेतसे बिल वाढत गेले व शेवटी एकूण बिल(शोरुम) ₹18000झाले व नरसी येथे धडी चे काम करण्यासाठी ऑटो रिक्षा भाडे व तेथील मजुरी तसेच बाश पंप मधून ऑईल लिकेज होत होते त्याचे असे सगळे मिळून बिल जवळपास 32हजाराच्या घरात गेले!!
बजेट 4हजार,खर्च32हजार!!
नंतर you tube वरील व्हिडिओ पाहून असे कळले की हे जे काही सर्व्हिस कॅम्प आयोजित करतात यामागे सुद्धा स्कॅम आहे ज्यात मजुरी फ्री म्हणून ग्राहकाला जाळ्यात ओढायचे व एकदा ग्राहक जाळ्यात अडकला की मग हा पार्ट गेला,तो जाईल असे म्हणून स्पेअर पार्ट टाकून बिल वाढवायचे.ज्यात जेवढे जास्त बिल जेवढे कमिशन मेकॅनिक ला!
(खरे किती खोटे किती हे व्हिडिओ बनविणाऱ्या you tuber ला माहिती व वरून पाहणाऱ्या देवालाच माहिती,याची मी पुष्टी करत नाही)
वरून एक ऑफर होती,की लकी 20 ग्रहाकांपैकी एकाला 1gm सोन भेट म्हणून देणार होते....जे की 20 ग्राहकांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे ही ऑफर सुद्धा फसवी निघाली.
एवढे काम करून जेव्हा मी बिलात 10%सुट मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा त्यांनी सपशेल नकार दिला.
शेतकऱ्याला जिथे जिथे संधी मिळेल,तिथे तिथे झुकायला लावणारी ही व्यवस्था देशात सगळीकडे आहे...त्याच्या मालाला भाव नाही पण महागाई चया नावाखाली इतर सगळे वास्तू व सेवा महाग!
शेवटी हा पांढरा हत्ती आता पोसणे अवघड होत आहे असे ठरवून मी तिथून निघालो....पुन्हा काही दिवसांनी हेड लाईट बंद झाली,जी कॉल केल्यावर चार दिवसांनी मेकॅनिक येऊन चालू करून दिला,ते फक्त 2तासांसाठी,पुन्हा तोच प्रॉब्लेम.
कामाच्या दिवसात ट्रॅक्टर रात्री हेड लाईट नसल्यामुळे बंद होता.पुन्हा आज शो रूम ला कॉल केला असता ट्रॅक्टर नायगाव येथे आणावे लागेल असा निरोप मिळाला.
किती दुर्दशा महिंद्रा ट्रॅक्टर निवडून!!
दुपारी शो रूम लां पोहोचल्यावर असे कळले की लुझ कॉन्टॅक्ट मुळे हा बिघाड झाला जो की 120 रुपये खर्च करून दुरुस्त झाला तो पण warning देऊन....आता पुन्हा हेड लाईट गेली तर 14हजार रुपये खर्चून नवीन वायरिंग टाकावी लागेल!!
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की,घरचे माणसं चालक असतील तरच या व्यवसायात पडा अन्यथा पडलाच म्हणून समजा!!
टीप - नवनवीन electric व सेन्सर युक्त ट्रॅक्टर हे खिशाला न परवडणारे आहेत त्यामुळे जुने ते सोने या उक्तनुसार त्या त्या कंपनी चे प्रसिद्ध मॉडेल निवडा व खर्च टाळा.
धन्यवाद.
(Translated by Google)
Hello to all the Mahindra tractor owner farmers. As I was informed about the service camp, I came to the showroom in Naigaon on 25th January 2024 with my Mahindra Arjun Novo 605 Di-i tractor. Since the labor is free in the camp, I came to the camp with the intention of changing the engine oil and keeping a budget of 4000.
But as I kept telling about the small and big problems, the bill kept increasing and finally the total bill (showroom) became ₹18000 and the auto rickshaw fare and labor there to do the work of the dhadi at Narsi as well as the oil leakage from the Bash pump, all of which together made the bill around 32 thousand!!
Budget 4 thousand, cost 32 thousand!!
Later, after watching the video on YouTube, I came to know that there is a scam behind all these service camps where the customer is lured into the trap of free labor and once the customer is trapped in the trap, they increase the bill by adding spare parts, saying that if this part goes, it will go. The higher the bill, the more commission the mechanic gets!
(I do not confirm whether it is true or false, only the YouTuber who made this video knows and only God who is watching from above knows)
There was an offer from above that one of the lucky 20 customers would be given 1gm gold as a gift....which turned out to be a scam as the quota of 20 customers was not met.
After doing so much work, when I expressed my expectation of getting a 10% discount on the bill, they flatly refused.
This system that makes farmers bend wherever they get the opportunity is everywhere in the country... There is no price for their goods but all other buildings and services are expensive in the name of inflation!
Finally, deciding that this white elephant is now becoming difficult to feed, I left there.... After a few days, the headlight went off again, which after four days of calling, the mechanic came and turned on, that was only for 2 hours, again the same problem.
During the working day, the tractor was off at night due to the lack of headlight. When I called the showroom again today, I got a message that the tractor would have to be brought to Naigaon.
What a misfortune to choose a Mahindra tractor!!
When I reached the showroom in the afternoon, I came to know that this malfunction was caused by a loose contact, which was repaired by spending 120 rupees, but with a warning.... Now if the headlight goes off again, I will have to spend 14 thousand rupees and put in a new wiring!!
Finally, I would like to say that, only if the family members are drivers, get into this business, otherwise, consider it as if you have already got into it!!
Note - New electric and sensor-equipped tractors are not affordable for the pocket, so according to the saying that old is gold, choose the famous model of that company and avoid spending.
Thank you.